बेंगळूर : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. त्यानुसार गेल्या 24 तासात 1,708 नवे रुग्ण आढळून आले असून 2,463 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 28,83,947 वर पोहोचली असून 28,18,476 जणे बरे झाले आहेत. रविवारी 36 जणांचा बळी गेला असून आतापर्यंत एकूण 36,157 जणांना मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील 29,291 बाधितांवर उपचार सुरू आहेत. रविवारी दिवसभरात 1,56,564 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली असून यापैकी केवळ 1,708 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
Previous Articleआजपासून सरकारी कार्यालयात बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक
Next Article बेळगाव जिल्हय़ात सर्वाधिक कुपोषित बालके
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.