बेंगळूर : जीयोग्राफिकल इंडीकेशन टॅग (भौगोलिक संकेत) असणाऱया उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने बेंगळूरच्या देवनहळ्ळी विमानतळाजवळ आंतरराष्ट्रीय विक्री केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती अवजड उद्योगमंत्री जगदीश शेट्टर यांनी विधानसभेत दिली. काँग्रेसचे आमदार प्रसाद अब्बय्या यांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना शेट्टर म्हणाले, राज्यातील आयजी टॅग असणाऱया उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरुवातीला देवनहळ्ळी विमानतळाजवळ विक्री केंद्र सुरू करण्यात येईल. त्यानंतर राज्यभरात बसस्थानके, रेल्वेस्थानके व इतर ठिकाणी अशी केंद्रे सुरू करण्यात येतील. त्यामुळे विदेशातील प्रवाशांना देखील या उत्पादनांची ओळख होईल, असे त्यांनी सांगितले.
Previous Articleभाजपचे एम. के. प्राणेश विधानपरिषदेचे नवे उपसभापती
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.