प्रतिनिधी /पणजी
राज्यात पारा अचानक उतरला असून गोव्यात तापमान सुमारे 2 ते 3 डिग्री से. ने खाली उतरले आहे. त्यामुळे सर्वत्र हुडहुडी भरली असून आज आणि उद्या देखील तापमान असेच खाली राहील, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
रविवारी गोव्यात सर्वत्र पाऊस पडला मात्र सोमवारी देखील ढगाळ हवामान होते. त्यातच देशाच्या पश्चिम भागात निर्माण झालेल्या धुळी वादळाचे परिणाम म्हणून सर्वत्र धुके पसरल्यासारखे वातावरण होते. तसेच ते सोमवारी गोव्यातही होते. तथापि, पारा देखील खाली उतरल्याने सोमवारी भरदिवसा देखील तापमान थंड होते. दरम्यान, आज पुन्हा कडक थंडी पडण्याची शक्यता आहे. यंदा हिवाळा आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडण्याच्या बेतात आहे. गोव्यात हिवाळ्य़ाच्या दिवसात देखील किमान तापमान 17 ते 8 डि.से. एवढय़ापर्यंतच खाली उतरत असे. यंदा मात्र तापमान बरेच खाली उतरण्याची शक्यता आहे.