प्रतिनिधी / पणजी
कोरोना महासंकटाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून बंद असलेल्या महाविद्यालायांचे वर्ग 1 सप्टेंबरपासून सुरु होणार असल्याचे परिपत्रक गोवा विद्यापीठाचे निबंधक व्हाय. व्ही. रेड्डी यांनी जारी केले आहे. गोवा विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांनी याची नोंद घेऊन पुढील कार्यक्रम तयार करावे, असेही कळविण्यात आले आहे.
गेल्या काही महिन्यापासून संपूर्ण जगाबरोबरच राज्यातही कोरोना महामारीने थैमान घातले आहे. कोरोनाचा फैलाव टाळावा म्हणून शाळा, कॉलेजही बंद ठेवण्यात आल्या होत्या. वास्तविक 2020-21 शैक्षणिक वर्षाची सुरुवात ही जुनच्या दुसऱया आठवडय़ापासून सुरु होणार होती, मात्र महामारीमुळे यंदा महाविद्यालयाचे वर्ग एक सप्टेंबरपासून सुरु होणार आहेत.