बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री लक्ष्मण सवदी यांनी रस्ते वाहतूक कर्मचारी संघटनेला ७ ला करण्यात येणार बंद करू नये असे आवाहन केले आहे.
दरम्यान उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी सोमवारी राज्यातील रस्ते वाहतूक कर्मचारी संघटनेला ७ एप्रिलपासून बेमुदत संप पुकारण्याची योजना रद्द करण्याचे आवाहन केले. तसेच त्यांनी त्यांच्या वेतनात फेरबदल करण्याबाबत राज्य सरकारला अंतिम आवाहन करणार असल्याचेही त्यांनी आश्वासन दिले.
परिवहन मंत्र्यांनी युनियनने जाहीर केलेल्या नऊ पैकी आठ मागण्या आम्ही आधीच पूर्ण केल्या आहेत. प्रलंबित पगाराची फक्त मागणी प्रलंबित आहे. ६ व्या वेतन आयोगाने केलेल्या शिफारशींच्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांना पगार मिळावेत या मागणीवर सविस्तर चर्चा झाली आहे. वित्त विभागातील अधिकारी आता महामंडळ आणि सरकारवर होणाऱ्या संभाव्य आर्थिक बोजाचा अभ्यास करीत आहेत, असे ते म्हणाले.
राज्यातील रस्ते वाहतूक कर्मचारी संघटने सरकारला सहकार्य करावे लवकरच सरकार प्रलंबित मागणी संदर्भात सकारात्मक निर्णय घेईल. त्यामुळे करण्यात येणार संप टाळावा, असे आवाहन केले आहे.