प्रतिनिधी/ रत्नागिरी
राज्यामध्ये आतापर्यंत 76 डेल्टा प्लसचे रूग्ण आढळून आल़े यामध्ये सर्वाधित 15 डेल्टा प्लसचे रूग्ण रत्नागिरी जिह्यात आढळून आले आहेत़ डेल्टा व्हेरिएंटची वारंवार तपासणी होत नसतानाही 15 रूग्णसंख्या दिसून येत आहे अन्यथा हा आकडा अजुनही मोठा होवू शकला असत़ा दरम्यान समाधानाची बाब म्हणजे सोमवारी जिह्यात केवळ 65 नव्या कोरोनाबाधितंची नोंद करण्यात आली आह़े
राज्यामध्ये आढळून आलेल्या डेल्टा रूग्णामध्ये रत्नागिरी सर्वाधिक 15 त्यामधील दोघांचा मृत्यू झाला आह़े तर जळगाव 13 (मृत्यू नाही), मुंबई 11, कोल्हापूर 7, ठाणे 6, पुणे 6, पालघर 3, रायगड 3, नांदेड, गोंदीया, सिधुदुर्ग प्रत्येकी 2, चंद्रपूर, अकोला, सांगली, नंदुरबार, औरंगाबाद याठिकाणी प्रत्येकी 1 डेल्टा प्लस रूग्णांची नोंद करण्यात आली आह़े तसेच डेल्टा प्लसची लागण ही 19 ते 45 या वयोगटातील 39 जणांना झाली आह़े तर 18 वर्षाखालील 9 जणांना, 45 ते 60 मधील 19 जणांना लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आह़े
दरम्यान रत्नागिरी जिल्हात सोमवारी कोरोनाचे केवळ 65 रूग्ण आढळून आले आहेत़ तर 9 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल़ी सोमवारी जिह्यात कोरोनाच्या केवळ 3 हजार 507 चाचण्या करण्यात आल्य़ा यामध्ये आरटीपीसीआरच्या 2 हजार 258 चाचण्यांपैकी 32 तर ऍन्टीजेन टेस्टच्या 616 पैकी 33 जणांचे अहवाल कोरोनाबाधित आढळून आल़े यामध्ये मंडणगड 2, दापोली 1, खेड 8, गुहागर 2, चिपळूण 3, संगमेश्वर 12, रत्नागिरी 25, लांजा 6 तर राजापूर 6 असे तालुकानिहाय रूग्ण मिळून आले आहेत़ जिह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 75 हजार 39 इतकी झाली आह़े आरटीपीसीआर टेस्टचा विचार करता जिह्याचा पॉ†िझटिव्हीटी रेट 1.10 टक्के इतका आह़े उपचारात असलेल्या 9 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आह़े यामध्ये दापोली 1, खेड 1, गुहागर 1 रत्नागिरी 1, चिपळूण 4, संगमेश्वर 1 अशी तालुकानिहाय आकडेवारी आह़े तर मागील 24 तासात बरे झालेल्या 193 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आल़े एकूण बरे झालेल्यांची संख्या 71 हजार 377 इतकी झाली आह़े बरे होण्याचे प्रमाण 95.12 इतके आह़े तर 1 हजार 341 रूग्ण उपचारात दाखल करण्यात आले आहेत़ यामध्ये केवळ 298 रूग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून येत आहेत़