बेंगळूर/प्रतिनिधी
गृहराज्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी शुक्रवारी विधान परिषदेत सांगितले की राज्यात हुक्का बार आणि पार्लर बंद केले जातील असे म्हणाले. अमली पदार्थांवर आळा घालण्याच्या सरकारच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार करीत मंत्री बोम्माई यांनी हुक्का पार्लर हे मादक पदार्थांच्या वितरणाचे केंद्र बनले आहेत.
भाजपचे मुख्य सचेतक महंतेश कवटगीमठ यांनी राज्यात वाढत्या अंमली पदार्थांच्या प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला होता. बोम्माई म्हणाले की, अमली पदार्थांच्या व्यापाराला आळा घालण्यासाठी सरकार सर्व शक्य पावले उचलत आहे. विद्यमान कायद्यांव्यतिरिक्त, एक ड्रग्ज विरोधी धोरण देखील तयार केले जात आहे, जे असामाजिक घटकांवर अंकुश ठेवण्यास मदत करेल. यासह एनडीपीएस कायद्यात बदल करण्याचीही सरकार तयारी करत आहे.
दरम्यान, विरोधी पक्षनेते एस.आर. पाटील यांनी राज्यात हुक्का बारच्या वाढत्या समस्यांचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, हुक्का बंद होण्याची खात्री सरकार देईल. तसेच सरकार हुक्का बारसाठीचा परवाना स्थानिक संस्था देत आहे आणि त्याबाबत चर्चा सुरू आहे. ते असे म्हणाले.
हुक्का बार आणि पार्लर बंद करण्याविरोधात बरेच लॉबिंग सुरू आहे परंतु सरकार असे करण्यास वचनबद्ध आहे. राज्यातील बेंगळूर, मंगळूर, म्हैसूर यांच्यासह विविध शहरांमध्ये हुक्का बार बंदी घालण्यासाठी सध्याच्या एनडीपीएस कायद्यात अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत.