प्रतिनिधी/ बेळगाव
राज्यातील 413 सरकारी पदवीपूर्व महाविद्यालयामध्ये असणाऱया 14 हजार 564 अतिथी प्राध्यापकांना गेल्या तीन महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. या शिवाय त्यांच्या कित्येक मागण्या दीर्घ काळ प्रलंबित आहेत. याच्या निषेधार्थ दि. 25 रोजी हे सर्व प्राध्यापक निषेध मोर्चा काढुन जिल्हाधिकाऱयांना आणि तहसीलदारांना निवेदन देणार आहेत.
कर्नाटक राज्य अतिथी प्राध्यापक व शिक्षक संघ समितीच्या वतीने हा निषेध मोर्चा होणार आहे. याबाबत संघाचे असे म्हणणे आहे की राज्यात 14 हजार 564 अतिथी प्राध्यापक आहेत. 2019 जुलै मध्ये दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना शिविण्यासाठी 22 हजार 150 शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली. यांना 7500 मासिक वेतन मिळते. ते वाढवून मिळावे यासाठी संघाने सतत मागणी केली. दरम्यान विद्यापीठ अनुदान आयोगाने सेट, नेट व पीएचडी असणाऱया प्राध्यापकांना 13 हजार व अन्य शिक्षकांना 11 हजार द्यावेत, अशी सुचना केली. परंतु हे वाढीव वेतनच नव्हे तर गेल्या तीन महिन्यात कुठलेच वेतन मिळाले नाही.
कोविड-19 काळात या प्राध्यापक आणि शिक्षकांसमोर आर्थिक समस्या निर्माण झाली आहे. वर्षानुवर्षे हे दोन घटक काम करत असूनही त्यांना सेवेत कायम केले नाही. लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या समस्येवर सरकारने त्यांच्यासाठी कोणतेही पॅकेज दिले नाही. या सर्व मागण्यांकडे सरकार सातत्याने दुर्लक्ष करत असल्याने अखिल भारतीय डेमॉक्रॉटिक युथ ऑर्गनायझेशनतर्फे दि. 25 जून रोजी सकाळी 11 वाजता निषेध मोर्चा काढुन जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात येणार आहे.
दरम्यान बेळगावमध्ये सर्वांनाच येणे शक्मय नाही. सामाजिक अंतर पाळणे व गर्दी टाळणे आवश्यक असल्याने तालुका स्तरावर प्राध्यापक आणि शिक्षक तहसीलदारांना निवेदन देणार आहेत. बेळगावमध्ये कार्यरत असणाऱया संघाच्या शिक्षकांनी सकाळी 11 वाजता निषेध मोर्चात सहभागी व्हावे, असे कळविण्यात आले.