केवळ 11.39 लाख लोकांना मिळाला दुसरा डोस : मे महिन्याच्या दुसऱया आठवडय़ात 15 लाख डोस मिळण्याची शक्मयता
प्रतिनिधी / बेंगळूर
एकीकडे राज्यात कोरोना रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. तर दुसरीकडे लसीकरण केंद्राजवळ नो स्टॉक (साठा नाही), असे फलक झळकत आहेत. यापूर्वी लस घेण्यास टाळाटाळ करत असलेले नागरिक आता मात्र लस घेण्यासाठी गर्दी करत आहेत. पण, लसीकरण केंद्रात लसींचा तुटवडा असल्याचे दिसून येत असून तेथे लसींचा साठा नाही, असे उत्तर मिळत आहे. राज्यात 60 वर्षांच्या वयोगटातील 35.64 लाख लोकांनी प्रथम डोस घेतला असून त्यापैकी 8.23 लाख लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. 44 ते 59 वयोगटातील 36.38 लाख लोकांनी प्रथम डोस घेतला आहे. त्यापैकी केवळ 3.16 लाख लोकांना दुसरा डोस मिळाला आहे. राज्यात आतापर्यंत सुमारे 1 कोटी जणांचे लसीकरण झाले आहे.
कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसऱया डोस 28 दिवसानंतर घेणे बंधनकारक आहे. तर कॉव्हिशिल्डचा पहिला डोस घेतल्यानंतर 6 आठवडय़ानंतर दुसरा डोस घेणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत ज्ये÷ व आरोग्याच्या समस्या असलेल्यांचे पहिला डोस घेऊन सहा आठवडे पूर्ण झाले आहेत. त्यांना त्वरित दुसरा डोस देणे आवश्यक आहे. तसेच 45-59 वयोगटातील लोकांनी लसीचा पहिला डोस घेऊन पाच आठवडय़ांचा कालावधी पूर्ण केला आहे. पुढील आठवडय़ात त्यांना दुसरा डोस देणे गरजेचे आहे. परंतु, केंद्र सरकारकडून आवश्यक लसींचा पुरवठा न झाल्याने लसींचा तुडवटा भासत आहे. सध्या राज्यात 5.75 लाख कॉव्हिशिल्ड तर कोव्हक्सिनचे केवळ 30 हजार डोस शिल्लक आहेत. प्रारंभी लस घेण्यास टाळाटाळ करणारे नागरिक आता लस घेण्यास गर्दी करीत आहेत, असे लसीकरण केंद्रातील कर्मचारी सांगत आहेत.
आवश्यक लसींचा साठा नसल्याने समस्या
लसींची कमतरता असल्याने 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण मंदगतीने सुरू आहे. मे महिन्याच्या दुसऱया आठवडय़ात 15 लाख लसी मिळण्याची शक्मयता आहे. तसेच राज्य सरकारने 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. तत्पुर्वी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी 1 मे रोजी याला चालना दिली आहे. परंतु राज्यात आवश्यक लसींचा साठा नसल्याने समस्या निर्माण झाली आहे. 18 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी राज्य सरकारने आठवडय़ापूर्वीच कॉव्हिशिल्डचे 2 कोटी डोस खरेदीसाठी कंपनीला पैसे दिले आहेत.
दुसरा डोस देण्याला प्राधान्य देण्याची सूचना
परंतु, आतापर्यंत केवळ 3 लाख लसींचा पुरवठा झाला आहे. त्यामुळे बेंगळूरमध्ये 18 ते 44 वयोगटातील केवळ 5,136 नागरिकांना लस देण्यात आली आहे. सध्या लसींचा साठा असणाऱया ठिकाणी पहिल्या डोसपेक्षा दुसरा डोस देण्याला प्राधान्य देण्याची सूचना सरकारकडून करण्यात आली आहे. त्यामुळे पहिला डोस घेणाऱयांनी दुसरा डोस घेणाऱयांना संधी देण्याचे आवाहन आरोग्य खात्याने केले आहे.