प्रतिनिधी /बेंगळूर
राज्यात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या कमी होत आहे. सोमवारी हा आकडा 23,057 इतका होता. राज्यात मागील 24 तासांत 1,606 नवे रुग्ण आढळून आले. तर दिवसभरात 1,937 जण बरे झाले आहेत. तर 31 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
आरोग्य आणि कुटुंबकल्याण खात्याने प्रसिद्ध केलेल्या हेल्थ बुलेटिननुसार राज्यात मागील 24 तासांत 1,14,072 कोविड चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी 1.40 टक्के अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
राज्यात आतापर्यंत एकूण 28,96,163 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 28,36,678 जण संसर्गमुक्त झाले आहेत. तर एकूण 36,405 बाधितांचा बळी गेला आहे.
सोमवारी कोप्पळ, बिदर, बागलकोट आणि बळ्ळारी या पाच जिल्हय़ांत कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळून आला नाही. तर हावेरी जिल्हय़ात 2, चिक्कबळ्ळापूर 7, रामनगर 2, यादगीर 2, विजापूर 9 व धारवाड जिल्हय़ात केवळ 8 नवे रुग्ण आढळून आले. तर बेंगळूर शहर जिल्हय़ात 467, मंगळूर 357 आणि म्हैसूर जिल्हय़ात 163 रुग्णांची नोंद झाली आहे. या तिन्ही जिल्हय़ांत कोरोनाचे नवे रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण अधिक आहे.