प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 523 वर पोहोचली आहे. मंगळवारी सकाळपासून राज्यात 5 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर मागील 24 तासांत 14 रुग्ण संसर्गमुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्य आरोग्य खात्याने मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या बुलेटीनमध्ये सोमवारी रात्री कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या गुलबर्ग्यातील 6 रुग्णांचाही समावेश करण्यात आला आहे. बागलकोटमध्ये 3, बेंगळूर शहर जिल्प्त आणि गदगमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. गदगमध्ये 75 वर्षीय वृद्ध आणि बेंगळूरमध्ये 48 वर्षीय व्यक्ती संसर्गबाधित आढळली आहे. तर बागलकोटमध्ये एकाच कुटुंबातील 22 वर्षीय युवक आणि 20 वर्षीय युवती आणि 11 वर्षीय मुलाला कोरोनाची बाधा झाली आहे.