प्रतिनिधी/ पणजी
राज्यात गेल्या 120 वर्षांचा रेकॉर्ड तोडून सरांसरी एप्रिलमध्ये 52 मी.मी. इतका पाऊस यंदा नोंदवाला गेला आहे.
हवामान खात्याने शनिवारी सायंकाळी जारी केलेल्या माहिती नुसार वार्षिक एप्रिल महिन्यात सरांसरी 7.5 मी.मी. एवढी पावसाची नोंद होत असते. मात्र यंदा सरांसरी 52 मी.मी. एवढी विक्रमी नोंद झाली आहे. यापूर्वी 1902 मध्ये गोव्यात 229 मी. मी. पावसाची नोंद एका एप्रिल महिन्यात झाली होती. परंतु त्याकाळी पाऊस मोजण्यासाठी गोव्यात दोनच केंदे होती. आज तेरा केंद्रे आहेत. तसेच यावर्षी एप्रिलमध्ये पणजी येथे 22 एप्रिल रोजी 36.2 डिग्री सेल्सीअस एवढे उच्चतम तापमान होते. यापूर्वी 7 एप्रिल 1989 रोजी 29.8 डिग्री सेल्सीअस तापमान नोंदविले होते.