प्रतिनिधी/ पणजी
राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. काल नव्याने 259 कोरोनाबाधित रुग्ण सापडले. त्याचबरोबर कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाला. सक्रिय रुग्णांची संख्या आता 2332 झाली आहे. काल 207 जण कोरोनामुक्त झाले. कोरोनाचा वाढता कहर थोपविणे हे एक आव्हान बनले आहे. गोव्याच्या सर्वच भागात सध्या कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. पणजी, म्हापसा, मडगाव ही प्रमुख शहरे सध्या कोरोनाचे हॉटस्पॉट बनत आहेत. आतापर्यंत 72 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
वास्कोतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 372 झाली आहे तर कुठ्ठाळीची रुग्णसंख्या 298 झाली आहे. या दोन्ही भागामध्ये कोरोनाची दहशत कायम आहे. वास्को भाग तर स्वयंक्वॉरंटाईनच्या अवस्थेत आहे. राजधानी पणजीची रुग्णसंख्या वाढत चालली आहे. पणजीत रुग्णसंख्या 98 झाली आहे तर आल्तिनो भाग हॉटस्पॉट बनला आहे. म्हापसा येथील रुग्णांची संख्या 85 झाली आहे तर वाळपईतही रुग्णांची संख्या वाढून 85 झाली आहे. चिंबलमध्ये 100, मडगाव 180 तर फोंडा येथील रुग्णसंख्या 128 झाली आहे.
डिचोलीची रुग्णसंख्या 24, सांखळी 77, पेडणे 47, हळदोणा 21, बेतकी 18, कांदोळी 57, कासारवर्णे 9, कोलवाळ 49, खोर्ली 72, शिवोली 24, पर्वरी 49, मये 28, कुडचडे 39 तर काणकोणची रुग्णसंख्या 22 झाली आहे. बाळ्ळीत 56, कासावली 47, चिंचिणी 4, कुडतरी 61, लोटली 44, मडकई 34, केपे 35, सांगे 38, शिरोडा 29, धारबांदोडा 46 व नावेलीची रुग्णसंख्या 49 झाली आहे.