मंगळवारी 67 बाधितांचा बळी : दिवसभरात 8,778 नव्या रुग्णांची भर
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून मंगळवारी सोमवारपेक्षा कमी रुग्ण आढळले. मात्र, रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. मागील 24 तासांत राज्यात 67 बाधितांचा बळी गेला आहे. बेंगळूर शहर जिल्हय़ात 55 तर गुलबर्ग्यात 4, म्हैसूर, बिदरमध्ये प्रत्येकी दोन बाधितांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात मंगळवारी 8,778 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 6,079 जण संसर्गमुक्त झाले आहेत. राज्यात सध्या उपचारातील रुग्णसंख्या 78,617 इतकी आहे. आरोग्य खात्याने प्रसिद्ध केलेल्या हेल्थ बुलेटीननुसार राज्यात मागील 24 तासांत 1,21,899 कोविड चाचण्या करण्यात आल्या. चाचण्यांच्या तुलनेत पॉझिटिव्ह रुग्ण आढळण्याचे प्रमाण 7.20 टक्के इतके आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 60,77,735 कोरोना प्रतिबंधक लसी देण्यात आल्या आहेत.
राज्यात आतापर्यंत एकूण 10,83,647 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 9,92,003 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर एकूण 13,008 जणांचा बळी गेला आहे. सध्या सक्रिय रुग्णसंख्या 78,617 इतकी असून त्यापैकी 474 रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
मंगळवारी बेंगळूर शहर जिल्हय़ात 5,500, बळ्ळारीत 168, बेंगळूर ग्रामीण 163, बिदर 198, चिक्कबळ्ळापूर 114, मंगळूर 142, धारवाड 132, हासन 150, गुलबर्गा 290, म्हैसूर 492, मंडय़ा 114, तुमकूर 350 आणि विजापूर जिल्हय़ात 105 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.