बेंगळूर : राज्यात नवे कोरोना रुग्ण आढळण्याच्या प्रमाणात सातत्याने घट होत आहे. बुधवारी 4,436 नव्या बाधितांची नोंद झाली आहे. राज्यात मागील 24 तासांत 1,70,654 कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्या तुलनेत पॉझिटिव्हिटी दर 2.59 टक्के इतका आहे. दरम्यान, दिवसभरात 123 बाधितांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचा दर 2.77 टक्के इतका आहे. तर बुधवारी 6,455 जण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे सक्रिय रुग्णसंख्या 1,16,450 पर्यंत खाली आहे. राज्यात आतापर्यंत 28,19,465 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 26,68,705 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 34,287 इतका झाला आहे.
Previous Articleप्रवासी वाहनांच्या जूनमधील करात 50 टक्के सूट
Next Article म्हैसूर जिल्हा पालकमंत्रिपदी एम. टी. बी. नागराज
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.