बेंगळूर /प्रतिनिधी
राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात कोरोनाचा दररोज नवा विक्रम होत आहे. गुरुवारी राज्यात २५ हजाराहून अधिक पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. गुरुवारी राज्यात २५,७९५ बाधितांची नोंद झाली. तर ५,६२४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत १३,८८५ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान राज्यात एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १२,४७,९९७ वर पोहोचली आहे. तर १०,३७,८५७ जण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले आहेत. राज्यात सध्या १,९५,९९३ जणांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत एकूण २,४१,७९,१६९ हून अधिक नमुन्यांची चाचणी घेण्यात आली असून त्यापैकी गुरुवारी १,६२,५३४ जणांची चाचणी घेण्यात आली.
बेंगळूर शहरी जिल्ह्यात १५,२४४ नवीन संक्रमित रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात कोरोना सकारात्मकता दर १५.८७ टक्के होता, तर मृत्यु दर (सीएफआर) ०.४७ टक्के होता.