बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात लसीकरणाच्या चौथ्या दिवशी दहा हजाराहून अधिक ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. गुरुवार राज्यात १०,५२५ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. कोरोना लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यात वयोवृद्ध नागरिक आणि ४५ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील लोकांसाठी लसीकरण सुरु आहे. मोहिमेच्या चौथ्या दिवशी गुरुवारी राज्यभरात १०,५२५ ज्येष्ठ नागरिकांना लसीचा पहिला डोस मिळाला, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या माहितीनुसार लसीकरण करण्यात आलेले १,५६१ लोक ४५-६० वयोगटातील होते. एकूणच, ४८ दिवसांच्या शेवटी १६,२०३ लोकांना संपूर्ण राज्यात लस देण्यात आली आहे.