प्रतिनिधी/ बेंगळूर
लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर कोरोनाबाधितांचा आकडा मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. राज्यात मागील 24 तासांत 48 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 753 वर पोहोचली आहे. गुरुवारी हा आकडा 705 होता. मात्र कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याने आरोग्य खात्याला हादरा बसला आहे.
एकाच दिवशी राज्यात 48 रुग्ण आढळून येण्याची ही पहिलीच वेळ आहे. मागील आठवडाभरात संसर्गमुक्त होणाऱयांची संख्या अधिक असल्याने कोरोनाबद्दल जनतेतील भीती काही प्रमाणात कमी झाली होती. त्यातही दावणगेरेत दोन रुग्ण संसर्गमुक्त झाल्यानंतर 20 दिवस येथे एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नव्हता. मात्र रविवार दि. 3 मे रोजी कोरोनाग्रस्त परिचारिका कोरोनाग्रस्त आढळली. त्यानंतर या जिल्हय़ात सातत्याने रुग्णांचा आकडा वाढत आहे. शुक्रवारी येथे 14 नवे रुग्ण आढळून आले. त्यामध्ये 6 लहान मुलांचा समावेश आहे. यातील पाचजण 10 वर्षांच्या आतील आहेत. दरम्यान जिल्हय़ातील रुग्णसंख्या 61 वर पोहोचली आहे. तर 4 जणांचा बळी गेला आहे.
कारवार जिल्हय़ातील भटकळमध्ये देखील रुग्णसंख्येत 12 ने भर पडली आहे. भटकळमधील 11 जण संसर्गमुक्त झाले होते. त्यामुळे मागील आठवडय़ात या जिल्हय़ाचा समावेश ग्रीन झोनमध्ये झाला होता. मात्र येथे अचानक रुग्णांचा आकडा वाढला आहे. बेळगाव जिल्हय़ात हिरेबागेवाडीत 10 तर कुडचीत 1 पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. बेंगळूर शहर जिल्हय़ात 7 नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामध्ये पाच पुरुष व तीन महिलांचा समावेश आहे. या जिल्हय़ातील रुग्णसंख्या 163 वर पोहोचली आहे. तर 84 जण संसर्गमुक्त झाले असून 6 जण मृत्यूमुखी पडले आहेत. बळ्ळारीतही 37 वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाली आहे.
चित्रदुर्गमध्ये तीन तबलिगींना पुन्हा कोरोना
गुजरातच्या अहमदाबादहून परतलेल्या तिघा तबलिगींना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे गीन झोनमध्ये असलेल्या चित्रदुर्गमधील जनतेत भीती पसरली आहे. दिल्लीतील निजामुद्दिन येथे तबलिग जमातच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या चित्रदुर्गमधील 15 जणांपैकी चौघांना कोरोनाची लागण झाली होती. ते गुजरातला गेल्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. ते संसर्गमुक्त झाल्यानंतर सर्वजण बसने चित्रदुर्गला परतले होते. या बसमध्ये तुमकूरमधील 18 जण होते, अशी माहिती चित्रदुर्ग डीएचओ डॉ. पालाक्ष यांनी दिली. शुक्रवार ठरला ‘