प्रतिनिधी /म्हापसा
ग्रे?ड -पेडे, हणजुण येथे पर्यटकांना हेरून नियमीत स्वरूपात मादक पदार्थाची विक्री करणार्या मारेड्डी भारत कुमार रेड्डी (27- मुळ, आंध्रप्रदेश ) या तरुणास मंगळवारी रात्री शिस्तबद्ध सापळा रचून हणजुण पोलिसांकडून चपळाईने ताब्यात घेण्यात आले. यावेळी त्याच्या ताब्यातील अंदाजे एक किलो वजनाचा गांजा पोलिसांनी जप्त केला असून आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत एक लाखाहून आधिक असल्याचे पोलिस निरीक्षक सुरज गांवस यांनी सांगितले. दरम्यान, दरवषी फ्ली मार्केट भरत असलेल्या याभागात नेहमीच देशी तसेच विदेशी पर्यटकांचे येणे जाणे असते. सध्या राज्यात कर्फ्य? लागुं असल्याने स्थानिक पोलिस दल इतर कामात व्यस्त असल्याची संधी साधत संशयित याभागातील देशी तसेच विदेशी पर्यटकांना हेरून त्यांना मोठय़ा प्रमाणात गांजाची विक्री करत होता.
गुप्त सुत्रांकडून यासंबंधात हणजुण पोलिसांना माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सुरज गांवस यांच्या मार्गदर्शनाखाली उप-निरीक्षक सुजय कोरगांवकर, हेड-कॉन्सटेबल शामसुंदर पार्सेकर, कॉन्सटेबल राजेश गोकर्णकर, सर्वेश सांळगांवकर, सिद्धेश नाईक, राज परब, तसेच महिला कॉन्स्ट?बल देविका घाडी यांनी मंगळवारी रात्री साडेआठच्या दरम्यान परिसरात सापळा रचून संशयिताच्या मागावर राहिले होते. दरम्यान, रात्री सव्वादहाच्या सुमारास संशयास्पद मारेड्डी भारत कुमार रेड्डी गिर्हिईकाच्या शोधात ग्रे?ड पेडे येथे आला असता आधीच त्या जागेत दबा धरून बसलेल्या पोलिस पथकाकडून त्याला घेराव घालण्यात आला, यावेळी त्याची झडती घेतली असतां त्याच्या ताब्यातील गांजा पोलिसांकडून जप्त करण्यात आला. दरम्यान, संशयित मारेड्डी भारत कुमार रेड्डी विरोधात आमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार रितसर गुन्हा? दाखल करण्यात आला असून सध्या त्याची रवानगी हणजुण पोलिस स्थानकाच्या कोठडीत करण्यात आली आहे. हणजुणचे उप-निरीक्षक सुजय कोरगांवकर निरीक्षक सुरज गांवस यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, कळंगुट येथील मासळी बाजाराच्या आवारात पार्क करून ठेवण्यात आलेल्या दोन स्कुटरच्या डिक्मया फोडून आतमधील महागडे दोन मोबाईल सेट तसेच एकवीस हजार चारशे रुपयांची रोकड लंपास केल्याप्रकरणी कळंगुट पोलिसांकडून संतोष कट्ठीमणी ( बिजापुर -कर्नाटक) आणी महम्मद इरफान ( हैद्राबाद ) या दोघां चोरटय़ांना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले.