बेंगळूर/प्रतिनिधी
देशात तिसऱ्या टप्प्यात कोरोना लसीकरण सुरु आहे. कर्नाटकात लसीकरणाच्या तिसऱ्या दिवशी ९,९०३ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. कोरोना लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यात वयोवृद्ध नागरिक आणि ४५ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील लोकांसाठी लसीकरण सुरु आहे. मोहिमेच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी राज्यभरात ९,९०३ ज्येष्ठ नागरिकांना लसीचा पहिला डोस मिळाला, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
दरम्यान ४७ दिवसात आतापर्यंत राज्यभर ८,५३,३५७ लसीकरण करण्यात आले आहे. एकट्या बीबीएमपी हद्दीत ४५-६० वयोगटातील ४१६ व्यक्ती आणि ४०६७ ज्येष्ठ नागरिकांना बुधवारी लसीकरण करण्यात आले. आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या माहितीनुसार लसीकरण करण्यात आलेले १,३५० लोक ४५-६० वयोगटातील होते.
राज्यपाल वजुभाई वाला यांना कोविड -१ लसचा पहिला डोस केसी जनरल रुग्णालयात मिळाला.त्यांना कोविशील्ड लस देण्यात आली. प्राथमिक व माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेश कुमार यांनाही त्याच रुग्णालयात लसीकरण करण्यात आले.