ऑनलाईन टीम
राज्यात कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण वाढले असून राज्याचा सध्याचा रिकव्हरी रेट 95.28 टक्के आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आज 2 हजार 771 नवे कोरोना रुग्ण आढळले असून तब्बल 2 हजार 613 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे आतापर्यंत एकूण 19 लाख 25 हजार 800 जण कोरोनातून बरे होऊन घरी गेले आहेत.
दरम्यान, राज्यात अद्याप 43 हजारांहून अधिक कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही चिंताजनक बाब आहे.