प्रतिनिधी/ पणजी
गोवा सरकारने जारी केलेल्या एका आदेशामुळे आजपासून राज्यातील पेट्रोलचे दर 59 पैशांनी वाढविण्यात आले आहेत. मात्र सरकारने डिझेलच्या दराला हात लावलेला नाही.
राज्याची आर्थिक स्थिती नाजूक बनलेली आहे. अर्थसंकल्प पूर्वीच्या काळात सरकारने काही कडक आर्थिक उपाययोजना हाती घेतल्या असून पेट्रोलवरील व्हॅट करात 20 टक्केवरून 21 टक्के अशी 1 टक्का वाढ केली आहे. ही वाढ 59 पैसे प्रतिलिटर एवढी असून त्याद्वारे सरकारला वर्षाकाठी 15 ते 20 कोटी रुपये अतिरिक्त महसूल मिळणार आहे.