बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोनाचा वेग वाढत चालला आहे. तसेच राज्यात २४ तासात २१ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील अकरा दिवसात १०९ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात दररोज वाढणारी कोरोनाची संख्या सरकारची डोकेदुखी वाढवत आहे. राज्यात कोरोनाची दुसरी लाट असल्याने सरकार खबरदारी घेत आहे. कोरोनाची दुसरी लाट भयंकर असू शकते असा अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे. दरम्यान कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर मात करण्यासाठी सरकार सज्ज आहे. राज्यात सलग कोरोनाची संख्या वाढत चालली आहे. राज्यात सोमवारी कोरोना रुग्णांची संख्या २,७०० च्या वर गेली होती. मंगळवारी तीच संख्या २,९०० च्या वर गेली आहे. राज्यात दिवसागणिक कोरोनाचा वेग वाढतच आहे. राज्यात कोरोनाचा वेग वाढल्याने मंगळवारी २,९७५ रुग्णांची भर पडली. राज्यात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या २५,५४१ वर पोहोचली आहे.
आरोग्य विभागाने जारी केलेल्या बुलेटिननुसार राज्यात मंगळवारी २,९७५ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे म्हंटले आहे. तर, राज्यातील विविध जिल्ह्यातून १,२६२ रुग्ण बरे झाल्यानंतर घरी परतले आहेत. मंगळवारी कोरोनामुळे २१ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे राज्यात आतापर्यंत १२,५४१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान राज्यात बेंगळूर शहरी जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. बेंगळूरमध्ये प्रशासन कोरोनावर नजर ठेऊन आहे. जिल्ह्यात प्रशासनाने अनेक कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. तसेच कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यास दंडाची रक्कमही वाढवली आहे. तसेच राज्यात मंगळवार पासून राज्यात कडक नियमावली लागू केली आहे. दरम्यान मंगळवारी जिल्ह्यात १,९८४ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर ६५० रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी परतले आहेत बेंगळूर शहरी जिल्ह्यात कोरोना संक्रमणामुळे आतापर्यंत ४,६०१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.