उपचारातील रुग्णसंख्या 24,708 : सोमवारी 1,509 जण पॉझिटिव्ह
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 8 लाख 74 हजार 555 वर पोहोचली आहे. मागील चार दिवसांच्या तुलनेत सोमवारी राज्यात कमी रुग्ण आढळून आले आहेत. मागील चोवीस तासांमध्ये केलेल्या 96 हजार 95 कोविड चाचण्यांपैकी 1.57 टक्के म्हणजेच 1 हजार 509 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यात सोमवारी दिवसभरात 1 हजार 645 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आतापर्यंत 8 लाख 38 हजार 150 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर एकूण 11 हजार 678 बाधितांचा बळी गेला आहे. सोमवारी दिवसभरात 24 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सध्या राज्यभरात 24 हजार 708 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर विविध इस्पितळांमध्ये उपचार केले जात आहेत. बेंगळूर शहर जिल्हा वगळता राज्यातील इतर जिल्हय़ांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. बेंगळूरमध्ये सध्या कोरोनाचे 18 हजार 409 सक्रिय रुग्ण आहेत. उर्वरित जिल्हय़ांमध्ये 600 पेक्षा कमी सक्रिय रुग्ण आहेत. बिदर, चामराजनगर, गदग, कोडगू, कोप्पळ आणि यादगीर जिल्हय़ांत शंभरपेक्षा कमी उपचारातील रुग्ण आहेत.