दिवसभरात 28,053 जण कोरोनामुक्त : सक्रिय रुग्णसंख्या 3.42 लाखांवर
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या कमी होत असून ती रविवारी 3,42,010 पर्यंत खाली आली आहे. दरम्यान, राज्यात मागील चोवीस तासांमध्ये 20,378 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात 28,053 जण संसर्गमुक्त झाले आहेत. दरम्यान, 382 बाधितांचा मृत्यू झाला आहे.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने प्रसिद्ध केलेल्या हेल्थ बुलेटिननुसार राज्यात आतापर्यंत एकूण 2,96,14,631 कोविड चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी 25,87,827 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आढळून आलेल्यांपैकी एकूण 22,17,117 जण कोरोनामुक्त झाले तर एकूण 28,679 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
राज्यात अजूनही 3,42,010 रुग्णांवर विविध इस्पितळे, कोविड केअर सेंटर आणि होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरू आहेत. राज्यात रविवारी 1,38,809 कोविड चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी 1,06,599 चाचण्या आरटी-पीसीआर आणि 32,210 चाचण्या रॅपिड ऍन्टीजेन पद्धतीच्या आहेत. चाचण्यांच्या तुलनेत पॉझिटिव्हीटीचा दर 14.68 इतका आहे.