बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात गुरुवारी ११,०४२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. तर याच वेळी १५,७२१ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले. तसेच गुरुवारी कोरोनामुळे १९४ रुग्णांचा मृत्यू झाला. दरम्यान, राज्यात लॉकडाऊनमुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा वेग कमी झाला आहे.
दरम्यान, राज्यात आतापर्यंत एकूण २७,३९,२९० कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी २४,९६,१३२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच कोरोनामुळे आतापर्यंत ३२,४८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या २,१०,६५२ सक्रिय रुग्ण आहेत.
राज्यात बेंगळूर शहरी जिल्ह्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. आता जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला आहे. गुरुवारी जिल्ह्यात २,१९१ कोरोना संक्रमित रुग्णांची भर पडली. तर ४,८४६ रुग्ण कोरोनामुक्त झाले. तसेच कोरोनामुळे ४४ रुग्णांचा मृत्यू झाला.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात कोरोना सकारात्मकतेचा दर ६.५८ टक्के होता, तर केस मृत्यु दर (सीएफआर) १.७५ टक्के होता.