उपचारातील रुग्णसंख्या 41,996
बेंगळूर : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत असून सक्रिय रुग्णसंख्येतही घट होत आहे. राज्यात सोमवारी 2,848 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात 5,631 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, मागील चोवीस तासांत 67 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या 41,996 पर्यंत खाली आली आहे.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने दिलेल्या माहितीनुसार मागील चोवीस तासांत राज्यभरात 1,46,575 कोविड चाचण्या करण्यात आल्या. त्या तुलनेत पॉझिटिव्ह अहवाल येण्याचे प्रमाण 1.94 टक्के इतके होते. राज्यात आतापर्यंत एकूण 28,56,491 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 27,79,038 जण कोरोनामुक्त झाले तर एकूण 35,434 बाधितांचा बळी गेला आहे.