प्रतिनिधी /पणजी
गोव्यातील सुमारे 1 लाख बालकांना (5 वर्षांखालील) काल रविवारी पोलिओचे दोन डोस देण्यात आले असून जी मुले वंचित राहिली आहेत त्यांचा शोध घेऊन त्यांना पोलिओचे डोस येत्या दोन दिवसात देण्यात येतील, अशी माहिती आरोग्य खात्याने दिली आहे.
देशभरात पोलिओ लसीकरणाची विशेष मोहीम राबविण्यात आली होती. गोव्यातही ती मोहीम आरोग्य खात्याने राबविली आणि सर्व आरोग्य केंद्रे, उपकेंद्रातून पोलिओ डोस देण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यास चांगला प्रतिसाद मिळाल्याचा दावा आरोग्य खात्याने केला आहे.