शुक्रवारी 5,483 नव्या रुग्णांची भर : 84 रुग्णांचा मृत्यू
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात कोरोना संसर्ग वाढतच असून शुक्रवारी 6 जिल्हय़ांनी रुग्णसंख्येचे द्विशतक तर 9 जिल्हय़ांनी शतक गाठले आहे. राज्यात मागील 24 तासांमध्ये 5,483 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णसंख्ग्नया 1,24,115 इतकी झाली आहे. शुक्रवारी 84 बाधितांचा मृत्यू झाला तर 3,130 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने हेल्थ बुलेटिनद्वारे दिलेल्या माहितीनुसार कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. आतापर्यंत 49,788 जण संसर्गमुक्त झाले आहेत. तर मृतांचा आकडा 2,314 इतका झाला आहे. तसेच 72,005 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी 609 रुग्ण अतिदक्षता विभागातील आहेत.
मागील 24 तासांमध्ये बेंगळूर शहर जिल्हय़ात 2,220, बळ्ळारी 340, बेळगाव 217, उडुपी 213, मंगळूर व म्हैसूर प्रत्येकी 204, धारवाड 180, शिमोगा 158, गुलबर्गा 144, दावणगेरे 122, रायचूर 119, विजापूर 118, बेंगळूर ग्रामीण 105, बिदर 104, हासन 100, तुमकूर 95, कारवार 92, रामनगर 89, बागलकोट 88, चिक्कमंगळूर 74, मंडय़ा 65, हावेरी 57, यादगीर 56, चिक्कबळ्ळापूर 48, चामराजनगर 44, कोप्पळ 38, चित्रदुर्ग 35, कोलार 32 तसेच कोडगू जिल्हय़ात 30 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.