कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाख 12 हजार 504 वर : 42,901 जण संसर्गमुक्त
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी भर पडत आहे. बुधवारी राज्यभरात तब्बल 5,503 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 1,12,504 वर पोहोचली आहे. त्यातील 51,091 रुग्ण हे बेंगळूर शहर जिल्हय़ातील आहेत. दरम्यान, मागील चोवीस तासांत राज्यात 2,397 जण कोरोनामुक्त झाले तर 92 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आरोग्य खात्याने प्रसिद्ध केलेल्या हेल्थ बुलेटिननुसार बुधवारी राज्यात 5,503 नवे रुग्ण सापडले. त्यामुळे रुग्णसंख्या 1.12 लाख पार झाली आहे. आतापर्यंत 42,901 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर मृतांचा आकडा 2,147 वर पोहोचला आहे. राज्यात उपचारातील रुग्णसंख्या 67,448 इतकी आहे.
बुधवारी बेंगळूर शहर जिल्हय़ात 2,270, बळ्ळारी 338, बेळगाव 279, दावणगेरे 225, मंगळूर 208, म्हैसूर 200, धारवाड 175, उडुपी 173, गुलबर्गा 168, शिमोगा 131, तुमकूर 128, यादगीर 114, चिक्कबळ्ळापूर 96, हासन 95, बिदर 91, विजापूर 90, कोप्पळ 84, कारवार 75, रायचूर 73, मंडय़ा 70, गदग 61, बागलकोट 57, रामनगर 56, चित्रदुर्ग 52, हावेरी 50, बेंगळूर ग्रामीण 49, कोलार 34, चिक्कमंगळूर 33, चामराजनगर 20 आणि कोडगू जिल्हय़ात 8 नव्या रुग्णांची भर पडली आहे.