गोमेकॉचाही कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह
प्रतिनिधी/ पणजी
गोव्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. बुधवारी नवीन 42 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले, मात्र 84 कोरोनाबाधित रुग्ण मुक्त झाल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 660 एवढी झाली आहे. गोमेकॉतील कर्मचाऱयाला कोरोनाची लागण झाल्याने खळबळ माजली आहे.
मांगोरहिलमधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 283 वर पोहोचली आहे, तर मांगोरहिलशी संबंधित रुग्णांची संख्या 198 एवढी आहे. कुडतरी येथे एकूण 28 रुग्ण सापडले आहेत. मडगावमध्ये 16 रुग्ण, आंबेली येथे 21 रुग्ण व बेती येथे 1 रुग्ण सापडला आहे.
केपे येथील रुग्णसंख्या 5 झाली आहे. राय येथे 10 रुग्ण, इंदिरानगर चिंबल येथे 4 रुग्ण, नावेली येथे 3 रुग्ण तर वाडे येथे 1 व म्हापसा येथे एका रुग्णाची नोंद झाली आहे.
सडा वास्को येथील रुग्णांची एकूण संख्या 51 झाली आहे. बायणा 39, चिंबल 25, मोर्ले सत्तरी 21, न्यु वाडे येथे एकूण 17 एवढा आकडा नोंद झाला आहे. एकूण 2816 चाचण्या करण्यात आल्या. विविध हॉटेल व रेसिडन्सीमध्ये ठेवलेल्यांची संख्या 1184 एवढी आहे. साळ व कुंडई येथेही रुग्ण सापडले आहेत.
गोमेकॉ कर्मचाऱयालाही कोरोनाची लागण
गोमेकॉतील एक न्हावी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने गोमेकॉमध्ये खळबळ माजली आहे. त्याच्या संपर्कात आलेल्यांची स्वॅब घेण्यात आली आहे. त्याचबरोबर जे संपर्कात आले होते त्यांचीही चौकशी सुरू आहे. गोमेकॉत न्हावी कोविड पॉझिटिव्ह निघाल्याने अन्य कर्मचाऱयांमध्येही गोंधळ निर्माण झाला आहे. अन्य ज्या कर्मचाऱयांच्या संपर्कात हा तो आला होता त्यांचा शोध घेण्यात आला. त्याचे स्वॅब घेण्यात आले. कॅज्युअल्टीमधील काही कर्मचाऱयांचे स्वॅब घेण्यात आले आहेत.