प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्योत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. सीपीएड मैदानावर पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर पोलिसांचे पथसंचलन झाले.
पालकमंत्र्यांनी भुवनेश्वरी देवीचे पूजन केले. यावेळी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, जि. पं. अध्यक्षा आशा ऐहोळे, पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांच्यासह जिल्हय़ातील बहुतेक अधिकारी व राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते.
ध्वजारोहण व पथसंचलनानंतर कोरोना महामारीच्या काळात उत्तम सेवा बजावलेल्या डॉक्टर, पत्रकार, अंगणवाडी कार्यकर्त्या, आशा कार्यकर्त्या, शिक्षक, अधिकारी, पोलीस, सामाजिक कार्यकर्ते आदी 19 जणांचा सत्कार करण्यात आला. कोरोनाच्या काळातही येडियुराप्पांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने जनहिताचे कार्यक्रम राबविण्यात येत असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.