व्हिनान्सियो फुर्तादो आता तुरुंग महानिरीक्षक
प्रतिनिधी / पणजी
राज्य नागरी सेवेतील सहा अधिकाऱयांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्याचा आदेश सरकारने जारी केला आहे. कदंब महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक व्हिनान्सियो फुर्तादो यांना तुरुंग महानिरीक्षकांचा ताबा देण्यात आला आहे.
गोवा औद्योगिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डेरिक नेटो यांच्याकडे कदंब महामंडळाचा व्यवस्थापकीय संचालकपदाचा अतिरिक्त ताबा दिला आहे. नोटरी सेवा निबंधक ब्रिजेश मणेरकर यांना ईडीसीचे विशेष भूसंपादन अधिकारी नेमण्यात आले आहे, तर आशुतोष आपटे यांच्याकडे नोटरी सेवा निबंधकपद देण्यात आले आहे. वासुदेव शेटय़े यांना अतिरिक्त तुरुंग महानिरीक्षकपदाचा ताबा सोपवण्यात आला आहे. शिवाजी देसाई यांना सार्वजनिक गाऱहाणी खात्याचे संचालकपद देण्यात आले आहे. वरील सर्व अधिकाऱयांना नवीन पदावर तातडीने रुजू होण्यास सांगितले आहे.