रत्नागिरी व मालवण केंद्रावर होणार प्राथमिक फेरी
21 फेब्रुवारी ते 11 मार्च कालावधीत आयोजन
मालवण/प्रतिनिधी-
सांस्कृातिक कार्य संचालनालय आयोाजित 60 वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाटय़ स्पर्धा (प्राथमिक फेरी केंद्र- रlनागिरी व मालवण) 21 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी या कालावधीत रlनागिरी येथील स्वा. वि. दा. सावरकर नाटय़गृह येथे सायंकाळी 6 वाजता तसेच 2 मार्च ते 11 मार्च या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्हय़ातील मालवण येथे मामा वरेरकर नाटय़गृह येथे सायंकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आली आहे. यापूर्वी हि स्पर्धा जानेवारी माfहन्यात आयोजीत करण्यात आली होती. परंतु कोरोनाच्या कारणास्तव सदरची स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती. यानंतर कोविड चा प्रादुभा&व कमी झाल्याने राज्य शासनाने या स्पर्धेसाठी हिरवा कंदिल दाखविल्याने स्पर्धेचे अंतिम वेळापत्रक नव्याने जाहिर करण्यात आले आहे.