आरटी-पीसीआर निगेटिव्हची सक्ती
बेंगळूर : कोरोना परिस्थितीमुळे मागील एप्रिल महिन्यांपासून बंद ठेवण्यात आलेली कर्नाटक-केरळ राज्यांमधील बससेवा मंगळवारपासून सुरू करण्यात आली आहे. केरळ राज्यात झिका व्हायरचे रुग्ण आढळून आलेले असतानाच कर्नाटक परिवहन महामंडळाने केरळमधील विविध भागात राज्यातून बसेस सोडण्यास हिरवा कंदील दाखविला आहे. याकरिता राज्य सरकारने मार्गसूची जारी केली आहे. केरळमधून कर्नाटकात येणाऱयांना 72 तास अगोदर केलेल्या कोविड चाचणीचा निगेटिव्ह (आरटी-पीसीआर) अहवाल आणि कोरोना प्रतिबंधक लसीचा किमान एक डोस घेतल्याचे प्रमाणपत्र सादर करण्याची अट घातली आहे. केरळमधून कर्नाटकात सातत्याने ये-जा कराव्या लागणाऱया विद्यार्थ्यांना, उद्योजकांना दर 15 दिवसातून एकदा आरटी-पीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे राज्य सरकारने जारी केलेल्या मार्गसूचीनुसार केरळ सीमेलगत चेकपोस्टवर प्रवाशांजवळील प्रमाणपत्रे पोलिसांकडून तपासण्यात येणार आहेत.