बेंगळूर
बिहार विधानसभा निवडणूक आणि विविध राज्यांमधील पोटनिवडणुकांमध्ये भाजपने आघाडी घेतली असून पक्षसंघटना आणखी बळकट करण्यासाठी भाजपश्रेष्ठींनी
सर्व राज्यांच्या पक्षप्रभारींच्या
नेमणुका केल्या आहेत. त्यानुसार कर्नाटक राज्य भाजप प्रभारी म्हणून ज्येष्ठ नेते अरुणसिंग यांची नेमणूक करण्यात आली आहे. तर उपप्रभारी म्हणूक डी. के. अरुणा यांची वर्णी लावण्यात आली आहे.
अलिकडेच भाजपचे राष्ट्रीय सचिव म्हणून निवड झालेल्या माजी मंत्री सी. टी. रवी यांच्यावर महाराष्ट्र, गोवा आणि तामिळनाडू या तीन राज्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. राज्यातील आणखी एक भाजप नेते निर्मलकुमार सुराना यांची पॉन्डिचेरी भाजप प्रभारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. याआधी कर्नाटक भाजप प्रभारीपद सांभाळलेल्या पी. मुरलीधर राव यांच्यावर मध्यप्रदेशची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.