प्रतिनिधी/ रत्नागिरी
महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातील राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक मंडळावर अशासकीय सदस्यांची 3 वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यात मराठीच्या विकासाचे काम करणाऱया महाराष्ट्रातील मराठी संस्थांच्या प्रतिनिधी नमिता कीर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबद्दलचा शासन निर्णय नुकताच निर्गमित करण्यात आला आह़े या मंडळावर चांगले काम करण्याची संधी मिळत असल्याची प्रतिक्रिया नमिता कीर यांनी व्यक्त केल़ी
17 ऑक्टोबर 2015 रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्य मराठी विकास संस्थेच्या अशासकीय सदस्यांची नियुक्ती या शासन निर्णयाच्या दिनांकापासून 3 वर्ष कालावधीसाठी करण्यात येत़े सन 2018 नंतर अद्यापही अशासकीय सदस्यांची नेमणूक करण्यात आली नव्हत़ी राज्य मराठी विकास संस्थेच्या घटनेतील तरतुदीनुसार अशासकीय सदस्य आजपर्यंत कामकाज पाहत होत़े ही वस्तूस्थिती पाहता राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक मंडळावर नमिता कीर यांच्यासह 26 जणांची नवीन अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आह़े नमिता कीर या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्षा आहेत.