वार्ताहर / कोकरूड
राज्यमार्ग 150 च्या बिळाशी – कोकरूड मार्गावरील शिवनगर जवळ नवीन रस्त्यात मधेच खड्डा पडला असून या ठिकाणी दोन अपघात झाल्याने 96 कुळी मराठा संघटनेच्यावतीने रस्त्यात वृक्षारोपण करून , रस्ता दुरुस्थी साठी आठ दिवसांचा अल्टीमेंटम देण्यात आला आहे.
राज्य मार्ग 150 च्या रुंदीकरणाचे काम पावलेवाडी ते कोकरूड फाटा पर्यंत करण्यात आले आहे. या रस्त्याचे काम निकृष्टदर्जाचे झाले असून ठिकठिकाणी रस्त्यात खड्डे पडू लागल्याने दिसून येत आहे.
या मार्गावरील शिवनगर ( बिळाशी) जवळ रस्त्यात मधेच मोठा खड्डा पडून याठिकाणी मागील चार दिवसात दोन अपघात झाल्याच्या घटनेवरून, 96 कुळी मराठा संघटनेचे जिल्हाप्रमुख अनिल घोडे- पाटील यांनी या खड्डयात वृक्षारोपन करून झाड लावले आहे. या झाडांमुळे वाहन धारक सावध होऊन , त्यांना खड्डयाची कल्पना येत असून अपघाताला पायबंद बसत आहे.
९६ कुळी मराठा संघटनेच्यावतीने अवनतिका कन्स्ट्रक्शन कंपनीला आठ दिवसांचा अल्टीमेंटम देण्यात आला आहे. रस्ता दूरस्थ नझाल्यास वेगळ्या स्टाइलने आंदोलन करण्याचा ईशारा ही देण्यात आला आहे. जिल्हाप्रमुख अनिल घोडे – पाटील म्हणाले कि, ठेकेदाराचा लोकांच्या जीवाशी खेळ चालू असून, असून खोळंबा अनं नसून तोटा, अशी अवस्था रस्त्याची झाली आहे. रस्त्याच्या कामाची, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचीही चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी जिल्हाप्रमुख अनिल घोडे-पाटील, उपजिल्हाप्रमुख संजय घोडे- पाटील, युवराज दळवी, गणेश माळी, बाबू नांगरे, संग्राम घोडे, विलास नांगरे आदी उपस्थित होते.