इचलकरंजीतील कार्यालयातील खाबुगिरीची दोन महिन्यातील दुसरी घटना
प्रतिनिधी / इचलकरंजी
इचलकरंजी शहरातील महावितरण कंपनीच्या कार्यालयात सहा हजारांची लाच स्वीकारताना कोल्हापूर लाचलुचपत विभागाच्या पथकाने महावितरणच्या सहाय्यक आभियंत्याला रंगेहाथ पकडून अटक केली. सुनिल आबासाहेब चव्हाण (वय ५४, रा.काबाज प्लॉट, तक्षशिला रोड, महावीर पार्क, विश्रामबाग, सांगली) असे त्याचे नाव आहे. ही कारवाई बुधवारी केली असून या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसात गुन्हा नोंद करण्याचे काम रात्री उशीरापर्यत सुरु होते.
घटनास्थळावरून अशी माहिती मिळाली की शहरातील काडापूरे परिसरात उमेश निशीकांत माळी हे राहत असून, ते सरकारी इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करीत आहेत. त्यांनी त्यांच्या ग्राहकाच्या घरगुती वीज मीटर मंजुरीचा मागणी अर्ज महाावितरण कंपनीकडे केली होता. या मागणीचा अर्ज येथील विद्युत महाावितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता सुनिल चव्हाण यांच्याकडे मजुरीकरीता आला. त्यावेळी त्यांनी हा या अर्जाच्या मंजुरीसाठी माळी यांच्याकडे ७ हजारांच्या लाचेची मागणी केली होती.
याबाबतची तक्रार कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली. त्यानंतर या तक्रारीची पडताळणी करण्यात करुन सापळा रचण्यात आला. तडजोडीअंती सहा हजाराची लाच स्वीकारताना सहाय्यक अभियंता चव्हाण यांना लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडून अटक केली. या कारवाईमध्ये पोलीस उपाधीक्षक आदिनाथ बुधवंत, पोलीस अंमलदार शरद पोरे, पोलीस नाईक विकास माने, कृष्णात पाटील, कॉन्स्टेबल मयूर देसाई, रुपेश माने, विष्णू गुरव आदींचा सहभाग होता.
या कार्यालयातील दोन महिन्यातील दुसरी कारवाई कोल्हापूर लाचलुचपत वनविभागाने याच महाावितरण कंपनीच्या कबनूर शाखेतील सहाय्यक आभियंता अमर बाळासो कणसे (वय ३०, रा. अवधूत आखाडा, इचलकरंजी),
पंटर हारुण राशिद इब्रहीम लाटकर (वय ४०, या दोघांना वीज कनेक्शन दिल्याबद्दल बक्षीस म्हणून पाच हजारांची लाच स्वीकारताना दोन महिन्यांपुर्वी रंगेहाथ पकडून अटक केली आहे. या खाबुगिरीचे प्रकरण ताजे असताना बुधवारी पुन्हा या महाावितरण कंपनीतील सहाय्यक अभियंत्याला लाच स्वीकारताना अटक केली. त्यामुळे या कार्यालयामधील खाबुगिरी चालते हे उघड झाले आहे.
प्रामाणिक ठरला अप्रामाणिक
लाचखोर सुनिल चव्हाण याने १० नोव्हेबर २०२० रोजी घरगुती विजेचा वाणिज्य करण्यासाठी वापर केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाईचा अहवाल वरिष्ठ कार्यालयास न पाठविण्यासाठी लाच देताना संभाजी तुकाराम बसरवाडकर (रा. सावली सोसायटी) याला सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाव्दारे पकडून अटक करायला लावली होती. लाच घेणार नाही, असा प्रामाणिकपणाचा आव आणणार्या चव्हाण याला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडून त्याचा अप्रामाणिक उघड केला. महावितरणमध्ये घडल्या दोन घटना महावितरणमध्ये बुधवारी दोन वेगवेगळ्या घटना घडल्या.
या घटनेत महावितरणच्या वायरमनने वीज बिल भरण्यासाठी आलेल्या तानाजी खाडे या ग्राहकाचे रक्कम व वीज बिल हरवले होते. ही रक्कम व बिल वायरमन सुनील कोळी यांना सापडले. त्यांनी प्रमाणिकपणे कोळी यांना वरिष्ठांच्या हस्ते परत केले. ही प्रमाणिकपणाच्या दर्शनाची घटना एकीकडे घडली, तर दुसरीकडे वीज कनेक्शनसाठी इलेक्ट्रिकल कॉन्ट्रक्टरकडून लाच घेताना या कार्यालयातील सहाय्यक अभियंत्याला रंगेहाथ पकडून अटक केली. अशा दोन घटनांची वीज कर्मचार्यांमध्ये चर्चा आहे.