बेंगळूर / प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना राज्यसरकार मात्र धोका पत्करून १० वी च्या परीक्षा घेत आहे. आज सकाळी कर्नाटकचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेश कुमार यांनी बेंगळूर शहरी जिल्ह्यातील अनेकाळ तालुक्यातील एसएसएलसी परीक्षा केंद्राला भेट दिली. यावेळी मंत्री सुरेश कुमार यांनी परीक्षार्थी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांची विचारपूस केली.