माशेल येथे जागृती योजना चित्ररथ वाहनाचे शुभारंभ
वार्ताहर /माशेल
राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजना खऱया गरजूपर्यंत पोचविण्यासाठी युवक व सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. स्वयंपुर्ण गोव्याचा उद्देशपुर्तीसाठी सर्वानी सहकार्य करावे असे प्रतिपादन कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी केले.
माशेल येथील कदंब बसस्थानकावर प्रसिद्धी व माहिती खात्यातर्फे सरकारी योजनांची माहितीसह जागृतीफलकाचे चित्ररथ फिरत्या वाहनाच्या काल सोमवारी झालेल्या उद्घाटन सोहळय़ात ते बोलत होते. मंत्री गावडे यांच्याहस्ते बावटा दाखवून दोन ‘जागृती चित्ररथ वाहन’ सेवेचा शुभारंभ करण्यात आला. सरकारच्या विविध योजना लोकांपर्यंत पोचविण्यादृष्टीने हा प्रयत्न असल्याचे सुचित केले. चार वाहनावर हे माहिती जागृती चित्ररथ उत्तर गोवा व दक्षिण गोव्यात प्रचार करणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
23 सप्टे. पर्यंत सर्व गणेशोत्सव मंडप गाठण्याचे उद्दिष्टय़
‘स्वयंपुर्ण गोवा’, ‘गोवा हिरकमहोत्सवी’ व ‘आपली योजना जाणून घ्या’ या तीन योजनाविषयी माहिती या चित्ररथाच्या माध्यमातून उभारणी करण्यात आलेली आहे. सरकारने विविध योजना गरजूपर्यंत पाचणे हा एकमेव उद्दिष्टय ठेवण्यात आलेले आहे. सदर चित्ररथ राज्यात दोन्ही जिल्हय़ातील प्रत्येक ग्रामपंचायत, नगरपालीका व सार्वजनिक गणेशोत्सव मंडपापर्यंत 23 सप्टे. पर्यंत दाखल होण्याचे उद्धिष्य ठेवलेले आहे. केद्र सरकारच्या पुढाकाराने आत्मनिर्भर भारत, मोहीमेच्या अनुषंगाने राज्य सरकारतर्फे ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.
या मोहीमेअंतर्गत दोन्ही वाहने फिरत्या देखाव्याद्वारे गोव्यातील प्रत्येक गावा-गावात जाऊन जागृती करण्यात येणार आहे. आत्मनिर्भर भारत स्वयंपुर्ण गोवा दृष्टीने गोवा सरकारचे हे प्रयत्न आहेत. यावेळी बोलताना माहिती खात्याचे संचालक दिपक बांदेकर म्हणाले की सरकारच्या उपलब्ध असलेल्या विविध योजना प्रत्येक नागरिकापर्यंत पोचल्या पाहिजे, लोकासाठी असलेल्या योजना लोकापर्यंत पोहोचल्या तरच त्याचा उद्देश सफल होईल. शाम गावकर यांनी सुत्रसंचालन केले. प्रकाश नाईक यांनी आभार मानले. यावेळी सहाय्यक माहिती अधिकरी शांतो नाईक, सिद्धेश सामंत उपस्थित होते.