कोरोनाग्रस्त कर्मचाऱयांसह मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्याची मागणी
वार्ताहर / हिंडलगा
कर्नाटक सरकारने ग्रामपंचायतीमध्ये काम करणाऱया कर्मचाऱयांना कोरोना योद्धय़ांचा दर्जा दिला आहे. पण, कर्मचाऱयांना कोणत्याच सोयी-सुविधा दिल्या जात नसल्याच्या निषेधार्थ तालुक्मयाच्या विविध ठिकाणच्या ग्रामपंचायतीमधील कर्मचाऱयांनी गुरुवार दि. 27 पासून पंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत कर्नाटक सरकारचा निषेध नोंदविण्यात आला.
याबाबत ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या पदाधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार मागील वर्षापासून प्रत्येक ग्रामपंचायतीमधील कर्मचारी जीव मुठीत घेऊन गावामध्ये जनजागृती, सॅनिटायझर फवारणी, स्वच्छता करण्यासह कोरोनाचा फैलाव रोखून रुग्णसंख्या कमी करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. यामध्ये काही कर्मचाऱयांना देखील कोरोनाची लागण होऊन कर्मचाऱयांचा मृत्यू देखील झाला आहे. पण, शासनाने मात्र कर्मचाऱयांसाठी कोणतेच अनुदान अथवा सुरक्षा पुरविली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या तालुक्मयातील कर्मचाऱयांनी गुरुवारी एकाचवेळी सर्वत्र काम बंद आंदोलन छेडून सरकारविरोधात पंचायत कार्यालयासमोर निदर्शने केली. त्यानुसार पश्चिम भागातील हिंडलगा, आंबेवाडी, हंदिगनूर, होनगा, मार्कंडेयनगर, सुळगा (हिं.), अगसगे, बेळवट्टी, कडोली, बडस (के. एच.) आदी पंचायतींच्या कर्मचाऱयांनी आंदोलनाला पाठिंबा देत सरकारविरोधात निदर्शने केली. तसेच पीडीओंना निवेदन देऊन कर्मचाऱयांना सर्व सोयी-सुविधा उपलब्ध कराव्यात. तसेच कोरोनाग्रस्त कर्मचारी व कोरोनाने मृत्यू झालेल्या कर्मचाऱयांना योग्य ती आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे.