सुहास पाटील / उंडाळे
बैलगाडी शर्यंत सुरु करणेविषयी अजितदादा काय म्हणतायत त्याला काडीची किमंत नाही. अजित पवारांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेग वेगळी स्टेटमेंट केली आहेत. असा आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला. कराड येथील बैलगाडा मालक धनाजी शिंदे यांच्या घरी त्यांनी भेट दिली. अजितदादा काय म्हणतायत त्याला काडीची किमंत नाही. अजित पवारांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेग वेगळी स्टेटमेंट केली आहेत. हा राजकारणाचा मुद्दा नाही. त्यांची भाषणे काडून पहा.
बैलगाडी शर्यंत चालू नाही झाली तर अजित पवार नाव सांगणार नाही. अशी त्यांची भाषणे आहेत. झ- यातले आंदोलन सरकारला मोडून काढायचे होते. दोन वर्षात कोर्टाकडे का गेला नाही. मराठा आरक्षणाचा त्यांनीच ( सरकार ) वकील नेमला होता. सरकार आमच्याकडे कागदपत्र देत नाही. म्हणून आम्ही मराठा आरक्षणाबाबत योग्य मत मांडू शकलो नाही. आजचे सरकार मोगलांच्या वृत्तीचे असल्याचा आरोपही आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.