उपाध्यक्षपदी जगदीश कवटगीमठ बिनविरोध
प्रतिनिधी / बेंगळूर
कर्नाटक राज्य सहकार महामंडळाच्या अध्यक्षपदी माजी मंत्री जी. टी. देवेगौडा तर उपाध्यक्षपदी जगदीश कवटगीमठ यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मंगळवारी अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. दरम्यान, या दोघांचाच अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक अधिकाऱयांनी केली.
नूतन अध्यक्ष जी. टी. देवेगौडा आणि उपाध्यक्ष जगदीश कवटगीमठ यांचे माजी मंत्री एच. के. पाटील, अपेक्स बँकेचे अध्यक्ष बेळ्ळी प्रकाश, उपाध्यक्ष जी. डी. हरिषगौडा, सहकार बाजार समिती महामंडळाचे अध्यक्ष एम. एन. राजेंद्रकुमार, सहकार महिला मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला बेलदाळे यांनी अभिनंदन केले.
राज्यातील सहकारी संघांच्या स्थितीबाबत सर्व्हे करून राज्य सरकारकडे अहवाल सादर केला जाईल. कोणकोणते संघ तोटय़ात आणि फायद्यात आहेत, याची माहिती सर्व्हे केल्यानंतच मिळणार आहे. सहकारी संस्थांच्या वास्तविक स्थितीचा अहवाल सादर करून त्यांच्या विकासासाठी प्रयत्न केले जातील, असे नूतन अध्यक्ष जी. टी. देवेगौडा यांनी सांगितले.