41 उपकेंद्रावर 19 हजार 545 उमेदवारांनी दिली परीक्षा
प्रतिनिधी / कोल्हापूर
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवारी राज्य सेवेची पूर्व परीक्षा पार पडली.41 केंद्रावर ही परीक्षा सुरळितपणे पार पडली अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांनी दिली. 41 केंद्रावर सकाळी व दुपारी अशा दोन सत्रात परीक्षा झाली.सकाळी 10 ते 12 या वेळेत झालेल्या परीक्षेसाठी 13 हजार 482 उमेदवारापैकी 9 हजार 786 उपस्थित तर 3 हजार 696 उमेदवार अनुपस्थित होते.दुपारी 2 ते 5 या वेळेत झालेल्या परीक्षेसाठी 13 हजार 482 उमेदवारापैकी 9 हजार 459 उपस्थित तर 3 हजार 723 उमेदवार अनुपस्थित होते.
राज्य सेवेची ही परीक्षा पाच वेळा पुढे ढकलण्यात आली होती.यानंतर 14 मार्च घेण्यात येणारी परीक्षा पुढे ढकलल्यामुळे राज्यभरात विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. या आंदोलनाची दखल घेत अखेर रविवारी ही परीक्षा घेण्यात आली.