बेळगाव : युवा स्क्वॅशपटू दीप्शिका थोरात हिने बेंगळुरात आयोजित कर्नाटक राज्य खुल्या स्क्वॅश चॅम्पियनशिप स्पर्धेत 11 वर्षाखालील वयोगटात सुवर्ण जिंकले तर 13 वर्षाखालील वयोगटात रौप्यपदकावर आपली मोहोर उमटवली. तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावरील अव्वल स्क्वॅशपटूंनी सहभाग घेतला होता. दीप्शिका सध्या राज्य मानांकन यादीत अव्वलस्थानी विराजमान आहे. बेंगळुरस्थित पोलीस उपअधीक्षक प्रताप थोरात यांची दीप्शिका ही कन्या होय. 9 वर्षीय दीप्शिकाने 11 वर्षाखालील वयोगटातील अंतिम लढतीत चौबे हिचा 10-3, 10-6, 10-2 अशा सरळ फरकाने पराभव केला आणि सुवर्ण जिंकले. त्यापूर्वी, तिने उपांत्य फेरीत रियांशिका वर्माचा 10-7, 10-4, 10-5 असा धुव्वा उडवला. उपांत्यपूर्व फेरीत तर तिने रिद्धी ठाकुरचा अगदी एकतर्फी फडशा पाडला होता. आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या माजी स्क्वॅशपटू मेखला सुभेदार व मान्यवरांच्या हस्ते दीप्शिकासह या स्पर्धेतील सर्व जेत्यांना गौरवण्यात आले. दीप्शिका बेंगळुरातील हेड स्टार्ट प्रशालेची विद्यार्थिनी असून तिला वडील प्रतापसिंग थोरात यांचेच मार्गदर्शन लाभते. गेम थेयरी अकादमीत तिने नवीन शेणॉय यांच्याकडून स्क्वॅशचे प्राथमिक धडे गिरवले. त्यानंतर ती आता राज्य स्तरावरील स्पर्धांमध्ये चमकते आहे. लष्करी परंपरेच्या थोरात कुटुंबातील प्रतापसिंग यांचे वडील दादासाहेब थोरात यांनी मराठा लाईट इन्फन्ट्रीत कार्यरत असताना नेमबाजीत पाचवेळा प्रेसिडेन्ट अवार्ड जिंकला होता.
Previous Articleगोवा हिरक महोत्सवासाठी 300 कोटींचे पॅकेज
Next Article वैभव पाटीलची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.