श्री चषक क्रिकेट स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव
श्री स्पोर्ट्स खडक गल्ली आयोजित श्री चषक निमंत्रितांच्या आंतरजिल्हा टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत राज इलेव्हन रायबाग, नरवीर स्पोर्ट्स वडगाव, डीबी स्पोर्ट्स, अल रजा संघांनी विजय मिळविला. रघु हवालदार, मुशाहीद, रूद्रा पारिश्वाड, शहानवाझ इनामदार यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. पहिल्या सामन्यात युवराज स्पोर्ट्सने 8 षटकात 3 बाद 93 धावा केल्या. त्याला उत्तर देताना राज स्पोर्ट्स रायबागने 7 षटकात 3 बाद 97 धावा करून सामना जिंकला. दुसऱया सामन्यात ब्लू पँथर संघाने 8 षटकात 7 बाद 45 धावा केल्या. त्याला उत्तर देताना नरवीर वडगाव संघाने 3 षटकात 1 बाद 48 धावा करून सामना 9 गडय़ानी जिंकला. तिसऱया सामन्यात डीबी संघाने 8 षटकात 3 बाद 115 धावा केल्या. त्याला उत्तर देताना बेळगाव वॉरियर्सने 8 षटकात 8 बाद 83 धावाच केल्या. चौथ्या सामन्यात कॉलेज बॉईज खानापूरने 8 षटकात 9 बाद 87 धावा केल्या. त्याला उत्तर देताना अल रजा संघाने 7 षटकात 90 धावा करून सामना 7 गडय़ानी जिंकला.