ऑनलाईन टीम / मुंबई :
पॉर्न फिल्म प्रकरणात अटक करण्यात आलेला बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा याला मुंबई सत्र न्यायालयाने 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. राज कुंद्रासोबत कंपनीचा आयटी हेड रायन थोरोपे याचीही रवानगी कोठडीत करण्यात आली आहे.
राज कुंद्रा याला काल रात्री अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या पोलीसांच्या गुन्हे शाखेकडून त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र, त्यानंतर राज कुंद्रा यांना अटक करण्यात आली आहे. दिवसभराच्या चौकशीनंतर गुन्हे शाखेने अटक केली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून मुंबई पोलीस मढ परिसरातील त्या बंगल्यातल्या पॉर्न फिल्म प्रकरणाविषयी तपास करत आहेत. फेब्रुवारी महिन्यात पोलिसांनी छापा टाकून हा प्रकार उधळून लावला होता. यावेळी एका मॉडेलची सुटका करण्यात आली होती. ही मॉडेल मुंबईत बॉलिवुडमध्ये अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी आली असताना पॉर्न फिल्म रॅकेटमध्ये अडकल्याची माहिती नंतर समोर आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित पॉर्न फिल्म निर्मिती प्रकरणामध्ये राज कुंद्रा मुख्य आरोपी आहे. राज कुंद्राच या संपूर्ण प्रकरणाचा सूत्रधार असल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे. त्याच आधारावर पोलिसांनी आज सकाळी रायन थार्प या व्यक्तीला अटक केली आहे. रायन थार्प देखील राज कुंद्राशी थेट संबंधित असून पॉर्न फिल्म निर्मितीमध्ये त्याचाही सहभाग असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
राज कुंद्राच्या अटकेनंतर त्याच्या कंपनीचा आयटी हेड रायन थोरोपे यालाही रायगडमधून अटक करण्यात आली आहे. रायन थोरोपे हा राज आणि शिल्पा शेट्टीचा अतिशय जवळचा व्यक्ती आहे. रायनने अनेक वर्षे राज आणि शिल्पा शेट्टी यांच्या कंपन्या ‘वियान गेमिंग प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘वियान इंडस्ट्रीज लिमिटेड’ या कंपन्यांमध्ये अनेक वर्ष काम केले आहे.