ऑनलाईन टीम / मुंबई :
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आजचा लातूर दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. तब्बेतीच्या कारणावरुन हा दौरा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मनसेच्या पहिल्या अधिवेशनानंतर राज ठाकरे आज मराठवाडा दौऱयावर जाणार होते. आपल्या अधिवेशनात प्रखर हिंदुत्वाची कास धरल्यानंतर मनसे मराठवाडय़ाकडे लक्ष केंद्रीत करणार होती. त्याच पार्श्वभूमीवर आज लातूर येथे ‘कृषी नवनिर्माण 2020’ चे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते होणार होते. मात्र, राज ठाकरे यांची प्रकृती ठीक नसल्याने हा दौरा तुर्तास पुढे ढकलण्यात आला आहे.
मराठवाड्यात बहुसंख्येने कट्टर हिंदुत्वाची विचारसरणी मानणारा मतदार वर्ग आहे. हर्षवर्धन जाधव यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिल्याने मराठवाडय़ात मनसेला आता स्थान निर्माण करण्याची गरज आहे. जनाधार वाढवण्याची आवश्यकता असल्याने मनसेने मराठवाडय़ावर लक्ष्य केंद्रीत करण्याचे ठरवले आहे.