प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव शहरासह परिसरात मंगळवारी सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू होती. यामुळे बऱयाच ठिकाणी झाडे व त्यांच्या फांद्या कोसळून नुकसान झाले. राणी चन्नम्मा नगर, पहिला स्टेजजवळ एक झाड कोसळून विजेच्या खांब्याचे नुकसान झाले. यामुळे या भागातील विजपुरवठा काहीकाळ ठप्प होता.
वाऱयासह कोसळलेल्या पावसामुळे शहराच्या बऱयाच भागात जुनाट झाडे व त्यांच्या फांद्या कोसळण्याचे प्रकार घडले आहेत. मंगळवारी सकाळी 10.15 च्या सुमारास पहिला स्टेज राणी चन्नम्मा नगर येथील गार्डन नजिक एक वृक्ष कोसळला यामध्ये विजवाहिन्यांसह दोन विजेच्या खांबांचे नुकसान झाले. त्याचबरोबर शेजारील इमारतींवर असणाऱया पाण्याच्या टाकीचेही नुकसान झाले आहे.
यामुळे काहीकाळ या परिसरातील विजपुरवठा ठप्प होता. या भागाचे हेस्कॉमचे सेक्शन ऑफिसर वेंकटेश कळ्ळीमनी यांनी तात्काळ पर्यायी वाहिनीवरून विजपुरवठा सुरळीत केला. तसेच हेस्कॉमच्या कर्मचाऱयांनी दुपारपर्यंत दुरूस्तीचे काम सुरू ठेवले होते.